पवित्रा इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग
प्रस्तावना

आमच्या संस्थेच्या माध्यमातून नर्सिंग ट्रेनिंग सेंटरचे छोटेसे रोपटे लावले आहे. या संस्थेची स्थापना २०११ मध्ये झाली आहे. संस्थेच्या अंतर्गत निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी सुधारित / जनरल नर्सिंग मिडवाईफरी (जी.एन.एम.) हा कोर्स २०२४ व बी एस सी नर्सिंग २०२५ या वर्षी रांजणगाव गणपती शिरूर पुणे (महाराष्ट्र) येथे चालू केला आहे.
१२ वी पास झाल्यावर विद्यार्थीनींना प्रश्न पडतो की पुढे काय? सर्वच मुलींच्या पालकांना पुढील शिक्षणासाठी खर्च करणे शक्य होईलच असे नाही. आपल्या ग्रामीण भागात कमी खर्च व नोकरीची जास्तीत जास्त संधी असणारे शिक्षण आवश्यक आहे. या कोर्सच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. कारण प्रत्येक विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सेसची आवश्यकता आहे. शिवाय शहरी भागातील नर्सेस ग्रामीण भागात येण्यास तयार नसतात. ग्रामीण व शहरी भागातील हॉस्पिटलमध्ये विशेषतः बाळंतपणाच्या केसमध्ये नर्सेसची अत्यंत आवश्यकता असते. हा कोर्स पुर्ण केल्यानंतर नोकरीसाठी शहरात जाण्यापेक्षा ग्रामीण भागातही नोकरी सहजपणे मिळू शकते. म्हणून आम्ही आपल्या रांजणगाव गणपती शिरूर पुणे ग्रामीण भागात परिचारिका (नर्सिंग) प्रशिक्षण केंद्र चालू केले आहे. यामुळे रांजणगाव गणपती तालुक्यात प्रथमच रांजणगाव गणपती येथे परिचारिका प्रशिक्षण केंद्र चालवितांना अत्यंत आनंद होत आहे.
या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून बी एस सी नर्सिंग / जी.एन.एम. कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. या कोर्सचा कालावधी अनुक्रमेव बी एस सी नर्सिंग ४ वर्षाचा . व जी.एन.एम. ३ वर्षांचा आहे. विद्यार्थीनींना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत, जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नगरपालिका, महानगरपालिका व खाजगी हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून मुलींना स्वावलंबी होण्यास या कोर्सचा मोठा फायदा होणार आहे.
या ट्रेनिंग सेंटरच्या प्रशिक्षणार्थीना प्रात्यक्षिकासाठी , ग्रामीण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र व विविध खाजगी हॉस्पिटल उपलब्ध करून दिले आहे. तसेच प्रशिक्षणार्थीना UPH /RPH सव्र्व्हे करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात पाठविले जाते. तसेच शैक्षणिक भेटी देऊन त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळते.
सदरील ट्रेनिंग सेंटर चालवितांना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पण त्यातून मार्ग काढून आम्ही पुढे जात आहोत. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गरीब, विधवा, परित्यक्ता मुलींना नर्सिंग प्रशिक्षण देऊन समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थीनींना नोकरीची संधी उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्याचे ध्येय ठेवत आहोत